Latest

मैत्रीच्या जाळ्यात अडकवलं, पैसे उकळले अन् घरात घुसून मारहाण ! राहुरीत हनीट्रॅपचा धक्कादायक प्रकार, नेमक प्रकरण काय?

मंडळी, आधी मैत्री केली, नंतर पैशांसाठी ब्लॅकमेल केलं आणि पैसे देण्यास नकार दिल्यानंतर थेट घरात घुसून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार राहुरीत समोर आलाय. नेमकं काय घडलं? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील एका तरुणाची दोन वर्षांपूर्वी शिर्डीतील महिलेशी ओळख झाली होती. हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली. मात्र, या मैत्रीचा गैरफायदा घेत महिलेनं हनीट्रॅपमध्ये अडकवून वेळोवेळी हजारो रुपये उकळल्याचा आरोप तरुणाने केला आहे.

९ नोव्हेंबरला पुन्हा पैशांची मागणी झाली. मात्र, तरुणाने नकार दिल्यानंतर त्याला धमकी देण्यात आली. १० नोव्हेंबरच्या पहाटे संबंधित महिला आणि पाच जणांनी घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला. तरुणाला मारहाण करून जबरदस्तीने औषध पाजल्याचा, तसेच मोबाईल आणि ११ हजार रुपये हिसकावल्याचा आरोप आहे.

सध्या तरुणावर लोणी येथे उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी त्याने केली आहे. तर मग मंडळी तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहता कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button