Latest

शेतकऱ्यांसमोर नवं संकट… आवक निम्म्यावर आली तरी अहिल्यानगरमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण, भाव आणखी पडणार का ?

अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक चित्र समोर आलं आहे. बाजारात कांद्याची आवक निम्म्याहून कमी झाली, तरी दर वाढण्याऐवजी घसरले आहेत. गेल्या तीन आठवड्यांत कांद्याच्या भावात तब्बल ६०० रुपयांपर्यंत घट झाली आहे. मग आवक कमी असतानाही कांदा स्वस्त का झाला?

नेप्ती उपबाजारात २१ सप्टेंबरला ६६ हजार ५४१ गोण्यांची आवक झाली होती. त्यावेळी सरासरी दर क्विंटलला २ हजार ७०० रुपये होता. मात्र, १० ऑक्टोबरला आवक घटून २७ हजार १९७ गोण्यांवर आली, तरी सरासरी दर २ हजार ३५० रुपयांपर्यंत घसरला. एक नंबरच्या कांद्याचा कमाल दरही ४ हजार ६०० रुपयांवरून ४ हजार रुपयांपर्यंत खाली आला.

कांदा व्यापाऱ्यांच्या मते, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील नव्या लाल कांद्याची आवक वाढल्याचा महाराष्ट्रातील दरांवर परिणाम झाला आहे. आवक घटूनही भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता कांद्याच्या दरांना पुन्हा उभारी कधी मिळणार, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button