Latest

अभिमानास्पद ! आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अहिल्यानगरचा डंका… ब्रिक्समध्ये नगरचे ८ खेळाडू दाखवणार योगासनांची ताकद !

अहिल्यानगरच्या आठ खेळाडूंना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळाली आहे. ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ २०२६ या आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्राच्या योगासन संघाची निवड झाली असून, या संघात नगरच्या आठ खेळाडूंचा समावेश आहे.

आर्यन खरात, प्रणव साहू, अंश मयेकर, रोहन तायडे, तृप्ती डोंगरे, रुद्राक्षी भावे, प्रांजळ व्हेन्ना आणि देवांशी वाकळे हे आठ खेळाडू आता आपल्या योगकौशल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

महाराष्ट्रातील एकूण १५ खेळाडूंचा या संघात समावेश असून, अहमदाबाद येथे १२ ऑक्टोबर रोजी त्यांचे योगासन प्रात्यक्षिक होणार आहे. या सादरीकरणासाठी खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर अहिल्यानगर जिल्ह्यात ७ ते १० ऑक्टोबरदरम्यान पार पडले.

या संघाच्या प्रशिक्षकपदी चंचल माळी, तर व्यवस्थापकपदी उमेश झोटिंग यांची निवड झाली आहे. या खेळाडूंच्या कामगिरीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरच्या या आठही खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button