Latest

मोठी बातमी : कर्जमाफी योजनेची साडेतीन लाख शेतकऱ्यांची आणखी एक यादी जाहीर…अहिल्यानगरच्या किती शेतकऱ्यांची नावे? जाणून घ्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत राज्य सरकारने १२ ऑक्टोबर रोजी ३ लाख ५१ हजार पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील ४ हजार ४१५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जाची माफी मिळणार आहे. मात्र, जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अद्याप आपल्या नावाची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात तब्बल १ लाख ९२ हजार २८२ कर्जखात्यांचा तपशील शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आला असून, कर्जाची एकूण रक्कम २ हजार ४१९ कोटी रुपयांहून अधिक आहे.

दुसरीकडे, दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना ओटीएस किंवा हेअरकट योजनेतून दिलासा मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी बँक, विकास संस्था आणि ग्रामपंचायतीतील यादी तपासावी. नाव आल्यास पुढील सूचनेनुसार आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. तुमच्या गावातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button