
तुमच्या मुलाला खासगी शाळेत मोफत प्रवेश मिळू शकतो, पण शाळेने जागा भरल्याचं सांगून प्रवेश नाकारला तर काय करायचं ? अनेक पालकांना याच नियमाची माहिती नसते. नेमका कसा आहे हा नियम? सगळं काही सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, २००९ च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार, सहा ते चौदा वर्षांच्या मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आहे. विशेष म्हणजे, विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील मुलांसाठी राखीव असतात.
मात्र, काही शाळा तांत्रिक कारणं सांगून अर्ज नाकारतात किंवा प्रवेश प्रक्रिया लांबवतात. अशा वेळी पालकांनी गप्प बसू नये. अर्ज नाकारण्याचं कारण लेखी मागावं आणि गरज पडल्यास जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.
कारण हा शाळेचा उपकार नाही, तर मुलांचा कायदेशीर हक्क आहे. तर मग मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.





