Latest

दवाखान्यात जाणाऱ्या १७ वर्षीय मुलीला स्कॉर्पिओमधून पळवून नेलं आणि त्यानंतर भयंकर घडलं… शेवगावमध्ये खळबळ !

शेवगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि अत्याचाराची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, तपासाच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. नेमकं काय घडलंय? सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह २४ ला नक्की फॉलो करा.

मंडळी, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबरला सायंकाळी १७ वर्षीय मुलगी वैद्यकीय उपचारासाठी पायी जात होती. त्यावेळी स्वामी समर्थ मंगल कार्यालयासमोर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेल्या काही जणांनी तिचा रस्ता अडवून तिला जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप आहे.

१५ ऑक्टोबरला ही मुलगी आढळल्यानंतर तिच्या जबाबावरून अक्षय बोरुडे आणि हनुमंत गोल्हार यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्याची कलमं वाढवण्यात आली. दरम्यान, मूळ तक्रारीत उल्लेख असलेल्या आणखी एका व्यक्तीचं नाव पुढील अहवालातून वगळल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणात निष्पक्ष चौकशी आणि कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर मग मंडळी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button