
मंडळी, समुद्रात चक्रीवादळ तयार झालं की ते किती वेगाने पुढे जाणार आणि कुठे धडकणार, हे हवामान खात्याला आधीच कसं समजतं ? नेमकं कसं काम करतं हवामान खातं? सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह २४ ला नक्की फॉलो करा.
मंडळी, सध्या बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ सक्रिय झालं आहे. त्याचा वेग आणि मार्ग ओळखण्यासाठी सर्वप्रथम INSAT-3D आणि INSAT-3DR हे हवामान उपग्रह ढगांची छायाचित्रं पाठवतात.
यानंतर शास्त्रज्ञ ड्वोरॅक तंत्राचा वापर करून वादळाची तीव्रता मोजतात. समुद्रातून वादळ किनाऱ्याजवळ आलं की डॉप्लर रडार त्याच्या हालचाली, वाऱ्याचा वेग आणि पावसावर लक्ष ठेवतात.
पुढे मिहिर आणि प्रत्युष या शक्तिशाली संगणकांवर हवामानाची माहिती तपासून संभाव्य मार्गाचा अंदाज लावला जातो. म्हणजेच उपग्रह, रडार आणि संगणक यांच्या मदतीने चक्रीवादळाचा मागोवा घेतला जातो. तर मग मंडळी तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा!





