
शाळेतून सायकलवर घरी जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवण्यात आलं… पुढे जे घडलं, त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नेमकं प्रकरण काय? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह २४ ला नक्की फॉलो करा.
मंडळी, श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात २ नोव्हेंबरला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आठवीत शिकणाऱ्या दोन मुली वडजाई वस्तीकडे सायकलवरून जात होत्या. तेवढ्यात ३५ ते ४० वयोगटातील दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांचा रस्ता अडवला.
सुरुवातीला रस्ता विचारला, नंतर सायकल आणि पैशांची मागणी करू लागले. त्यांच्यापैकी एकाच्या हातात बाटलीही होती. मुलींनी प्रसंगावधान राखत त्यांना विरोध केला. त्याचवेळी आणखी पाच मुली तिथे येताना दिसल्याने दोघांनी त्यांना सोडून दिलं.
या व्यक्तींकडे नंबर प्लेट नसलेली पांढरी व्हॅन असल्याचंही समोर आलं आहे. मात्र, अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झाल्याची माहिती नाही. आता पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. तर मग मंडळी या घटनेबाबत तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा.





