Explained

धीरज परदेशी हत्याकांडाचा संपूर्ण थरार; ७५० पानांच्या दोषारोपपत्रात मोठा खुलासा

अहिल्यानगर शहरात काही महिन्यांपूर्वी एक अशी घटना घडली, होती जिनं संपूर्ण महाराष्ट्राची शांतता ढवळून काढली. महापालिकेचा एक कंत्राटी कर्मचाऱ्याला, ड्युटीवर काम करत असताना, मारण्यात आले होते. धीरज कचरूसिंग राजपूत-परदेशी असं या दुर्दैवी तरुणाचं नाव होतं. त्याच्यावर झालेला जीवघेणा हल्ला, ३ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज, शहरात झालेलं तीव्र आंदोलन, एकाच समाजाच्या आरोपींची धरपकड, या सगळ्यामुळे जिल्ह्यातील वातावरण तापलं होतं. आता या प्रकरणात भिंगार कॅम्प पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात ७५० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे… या ७५० पानांच्या फाईलमध्ये पोलिसांना काय पुरावे सापडले? ती घटना नेमकी कशी घडली? ते १३ आरोपी कोण आहेत? आणि कायद्यानुसार त्यांना काय शिक्षा होऊ शकते?

ही घटना होती ७ ऑगस्ट २०२६ ची… अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागात धीरज कचरूसिंग राजपूत-परदेशी हे वायरमन म्हणून कंत्राटी पद्धतीने काम करत होते. ७ ऑगस्टच्या दुपारी साधारण ४ च्या सुमारास धीरज आणि त्यांचे काही सहकारी शहरातील मुकुंदनगर परिसरातील दर्गादायरा कब्रस्तान परिसरात पथदिवे दुरुस्त करण्यासाठी आणि नवीन लाईट्स बसवण्यासाठी गेले होते. ड्युटीवर असताना तेथे अचानक १० ते १५ जणांच्या झुंडीने धीरज यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

हल्लेखोरांच्या हातात लाकडी दांडके आणि लोखंडी पाईप होते. तपासात प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे ‘मार डालो’ असं ओरडत जमावाने हा अमानुष हल्ला केला होता.या भयंकर हल्ल्यात धीरज यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. परदेशी यांना जखमी अवस्थेत तेथेच सोडून हल्ल्यानंतर हे सर्व आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले.

धीरज यांना रक्ताच्या थारोळ्यात एका खासगी रुग्णालयात अतिशय गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलं. सलग तीन दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली, पण दुर्दैवाने ९ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर शहरात प्रचंड संतापाची लहर पसरली. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. रास्तारोको आंदोलन झाले. राजकीय नेत्यांनी नगरला भेटी दिल्या. आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय गेला. जातीय तणाव निर्माण झाला. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा आणि कटकारस्थान रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याबाबत दबाव वाढत गेल्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत, या प्रकरणाचा वेगाने तपास केला. सुरुवातीला हैदराबादमधून आणि स्थानिक पातळीवरून काही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. कसून तपास केल्यानंतर, आता पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात सुमारे ७५० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.

या ७५० पानांच्या दोषारोपपत्रात पोलिसांचा तपास नेमका काय सांगतो? हे अंदाजे समजून घेऊया :

१. हत्येचे नेमके कारण आणि कट :

पोलिसांनी यात स्पष्ट केलं आहे की, ही कोणती अचानक उफाळून आलेली हाणामारी नव्हती, तर पूर्वनियोजित कटकारस्थान रचून धीरज परदेशी यांच्यावर सुनियोजित हल्ला केला गेला.

२. तांत्रिक आणि वैद्यकीय पुरावे :

फॉरेन्सिक रिपोर्ट, मृत्यूनंतरचा शवविच्छेदन अहवाल ज्यात डोक्याला झालेल्या गंभीर आघातांमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

३. प्रत्यक्षदर्शींचे जबाब :

धीरज यांच्यासोबत कामाने गेलेले इतर सहकारी आणि आजूबाजूच्या लोकांचे जबाब यात नोंदवण्यात आले आहेत.

४. हल्ल्यात वापरलेली हत्यारे :

हल्ल्ल्यात वापरलेले लाकडी दांडके, लोखंडी पाईप आणि घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज किंवा मोबाईल लोकेशनचे तांत्रिक पुरावे यात जोडले गेले आहेत.

५. कलम कोणती लावली आहेत? ते पाहू…

पोलिसांनी या आरोपींवर भारतीय न्यायसंहितेनुसार खून करणे, आपसात कटकारस्थान रचणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि मारहाण करणे, अशा विविध गंभीर कलमांखाली दोषारोप ठेवले असल्याचे सांगितले जातेय.

या बहुचर्चित प्रकरणात पोलिसांनी एकूण १३ संशयित आरोपींविरुद्ध हे दोषारोपपत्र दाखल केले. त्यांची नावे अशी आहेत :

१. मेहराज इब्राहिम सय्यद (वय २२)
२. सिराज इब्राहिम सय्यद (वय २१)
३. मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद (वय २०)
४. युनूस खान साहेब शेख (वय ४८)
५. ख्वाजामिया उर्फ अक्रम याकुब सय्यद (वय ५०)
६. वसीम रहीम सय्यद (वय ४७)
७. इम्रान मुसा सय्यद (वय ३७)
८. जाहीर नुसरत शेख (वय २१)
९. मोहम्मद रशाद इमरान सय्यद (वय २१)
१०. अरमान लिकायत सय्यद (वय २१)
११. हुजैफ साजिद शेख (वय २१)
१२. अबजीमिया याकूब सय्यद (वय ४७)
१३. राहील कलीम शेख (वय २०)

या सर्व १३ जणांना वेगवेगळ्या टप्प्यांवर पोलिसांनी अटक केली होती. इतकेच नव्हे तर यातील काही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावून त्यांना मोठा दणका दिला. आता या सर्व आरोपींची कुंडलीच या दोषारोपपत्रात नमूद केली असल्याचे बोलले जातेय.

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न या १३ आरोपींना कायद्यानुसार काय शिक्षा होऊ शकते?

तर मित्रांनो, सरकारी पक्ष आणि मूळ फिर्यादीच्या वकिलांतर्फे या प्रकरणात भक्कम युक्तिवाद सुरू आहे.
जर न्यायालयात या १३ जणांवरील हत्येचा गुन्हा सिद्ध झाला, तर भारतीय कायद्यानुसार त्यांना जन्मठेप आणि आर्थिक दंडाची शिक्षा होऊ शकते.

कटकारस्थान :

हत्येचा कट रचल्याचे सिद्ध झाल्यास खुनाइतकीच कडक शिक्षा या कलमाखाली मिळते.

जलद गती न्यायालय :

या प्रकरणाची व्याप्ती आणि तीव्रता पाहता, हे खटला फास्ट-ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर निकाल देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे हा निकाल लवकर लागेल, अशी अपेक्षा आहे.

कर्तव्य बजावणाऱ्या एका सामान्य कंत्राटी कामगाराचा अशा प्रकारे गेलेला बळी, मनाला चटका लावणारा आहे. ७५० पानांच्या दोषारोपपत्रामुळे आता या खटल्याला गती मिळणार आहे. कोर्टात सुनावणी कशी चालते, पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का आणि यावर काय निकाल येतो, यावर आमचं लक्ष असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button