Latest

अग्निवीरांसाठी आनंदाची बातमी ! सरकार नियमात मोठा बदल करणार, आता अग्निवीरांना इतक्या वर्षांची मुदत वाढ मिळणार ?

अग्निवीर म्हणून सैन्यात भरती झालेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे ! ती म्हणजे चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतरही अग्निवीरांना सैन्यात राहण्याची संधी मिळू शकते. नेमका कसा आहे हा प्रस्ताव? सगळं सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, केंद्र सरकारने १४ जून २०२२ रोजी अग्निपथ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत सैन्य, नौदल आणि हवाई दलात चार वर्षांसाठी अग्निवीरांची भरती होते. चार वर्षांनंतर कामगिरी आणि पात्रतेनुसार २५ टक्क्यांपर्यंत अग्निवीरांना नियमित सेवेत सामावून घेतलं जातं.

आता उर्वरित अग्निवीरांपैकी काहींना दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. पहिल्या नौदल तुकडीचा सेवाकाळ २१ नोव्हेंबरला, हवाई दलाचा २१ डिसेंबरला, तर सैन्याचा ३१ डिसेंबरला पूर्ण होत आहे.

सध्या सेवा पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना सेवा निधीअंतर्गत सुमारे ११ लाख ७१ हजार रुपये मिळतात. मात्र, नियमित पेन्शन आणि ग्रॅच्युइटी मिळत नाही.

मुदतवाढीचा निर्णय झाला, तर अग्निवीरांच्या सेवेत मोठा बदल होऊ शकतो. तर मग मंडळी तुम्हाला हा प्रस्ताव कसा वाटतोय? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button