Latest

मजुरीचे पैसे मागितले म्हणून वॉचमनला दांडक्याने मारहाण ! अहिल्यानगर महापालिकेच्या ‘या’ नगरसेवकावर गुन्हा दाखल

अहिल्यानगरच्या दिल्लीगेट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मजुरीचे पैसे मागितल्याच्या रागातून एका वॉचमनला महापालिकेच्या नगरसेवकाकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. नेमकं काय आहे प्रकरण? सांगतो? पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, संजय सखाराम निंबाळकर हे ५७ वर्षीय कामगार गेल्या सहा महिन्यांपासून नगरसेवक श्रीपाद छिंदम यांच्या इमारतीच्या बांधकामावर वॉचमन म्हणून काम करत होते. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास त्यांनी बांधकामाला पाणी मारल्यानंतर स्वतःच्या हजेरीचे एक हजार रुपये मागितले.

मात्र, पैसे मागितल्याचा राग आल्याने आरोपीने शिवीगाळ सुरू करत लाकडी दांडक्याने त्यांच्या डाव्या हातावर मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

जखमी निंबाळकर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी श्रीपाद छिंदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमच्या मते, कष्टाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला अशी वागणूक देणं योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button