Latest

ब्रेकिंग : प्रवरा कालवा होणार बंदिस्त… इतक्या कोटींचा निधी मंजूर !

श्रीरामपूर आणि बेलापूरमधील नागरिकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. काय आहे नवीन अपडेट? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून प्रवरा कालव्यातील दूषित पाण्याचा प्रश्न चर्चेत आहे.

आता या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
श्रीरामपूरमधून प्रवरेचा डावा आणि उजवा कालवा जातो. या कालव्यांमधून शहरासह बेलापूर, उंबरगाव, पढेगाव, मातापूर, घुमनदेव, पाचेगाव, वडाळा महादेव, निपाणी वडगाव आणि खोकर या गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळतं.

मात्र, कालव्यात कचरा टाकणं, सांडपाणी सोडणं आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. आता कालवा बंदिस्त झाल्यानंतर सांडपाणी आणि कचऱ्यामुळे होणारं प्रदूषण कमी होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर पाण्याची गळती आणि बाष्पीभवनही कमी होऊ शकतं.

मात्र, हे काम प्रत्यक्ष कधी सुरू होणार, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. तुमच्या मते, प्रवरा कालवा बंदिस्त झाल्यानंतर दूषित पाण्याची समस्या सुटेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button