Latest

मोठी बातमी : समता पतसंस्थेची बदनामी केल्याप्रकरणी त्या यूट्यूबरविरुद्ध थेट ५०० कोटींचा दावा ; आता न्यायालयाने दिला मोठा आदेश !

कोपरगावच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेची चर्चा आता एका वेगळ्याच कारणामुळे सुरू झाली आहे. संस्थेबाबत चुकीचे वृत्त प्रसारित केल्याचा आरोप करत पतसंस्थेने पाथर्डी तालुक्यातील एका यूट्यूबरविरुद्ध तब्बल ५०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. नेमकं प्रकरण काय? सगळं सांगतो. त्या आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका.

मंडळी, समता पतसंस्थेने संबंधित यूट्यूबरला कायदेशीर नोटीस पाठवली होती. यूट्यूब आणि फेसबुकवर प्रसारित केलेले वृत्त हटवावे, संस्थेची लेखी माफी मागावी आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच वृत्तपत्रांमध्ये जाहीर माफी प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

मात्र, नोटिशीनुसार माफी मागितली नाही आणि संबंधित वृत्तही हटवले नसल्याचा संस्थेचा आरोप आहे. त्यामुळे अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. अहिल्यानगर येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयाने संबंधित यूट्यूबरला समन्स नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. पण मंडळी तुमच्या मते या प्रकरणात पुढे काय घडणार? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button