Latest

मोठी बातमी ! अहिल्यानगरमधील ट्रॅफिक जॅमची समस्या कायमची संपणार, ‘हे’ ८ रस्ते होणार वन-वे, महापालिकेचा प्रस्ताव तयार

नगरकरांनो, बाजारपेठेत जाताना ट्रॅफिकमध्ये अडकता ? मग आता ही समस्या कायमची संपणार आहे. कारण शहरातील आठ प्रमुख रस्ते वन-वे केले जाणार आहेत. नेमकं काय आहे प्रकरण ? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

अहिल्यानगरमध्ये वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते आणि पार्किंगच्या समस्येमुळे वाहतूक कोंडी डोकेदुखी बनली आहे. विशेषतः मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना रोजच या त्रासाचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महापालिका आणि वाहतूक शाखेने आठ प्रमुख मार्गांवर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

एसपी मुम्मका सुदर्शन यांनी २२ ऑक्टोबर रोजी हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. या प्रस्तावात चौपाटी कारंजा, आनंदी बाजार चौक, कोर्ट परिसर, चितळे रोड, कापड बाजार, माणिक चौक, नवी पेठ आणि भिंगारवाला चौकासह महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे.

फलटण पोलीस चौकी ते पुणे हायवे परिसरातील मार्गाचाही प्रस्तावात समावेश आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. तुमच्या मते, वन-वे व्यवस्था उपयोगी ठरेल का? कमेंट करून नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button