
अहिल्यानगरच्या बहुचर्चित सिस्पे घोटाळा प्रकरणात एक नवीन अपडेट हाती आली आहे. काय आहे नवीन अपडेट? सगळं सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका. मंडळी, सिस्पे घोटाळ्यात आणखी एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलय.
दशरथ विठ्ठल रोडे, वय ५१ वर्षे, असं आरोपीचं नाव आहे. तो श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी रोड परिसरात राहणारा आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात २०२५ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपांशी संबंधित या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार केलं होतं. २२ ऑक्टोबर रोजी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी फाटा परिसरात शोध घेतला आणि दशरथ रोडेला ताब्यात घेतलं.
त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला आर्थिक गुन्हे शाखेकडे हजर करण्यात आलं आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सिस्पे घोटाळ्यातील ठेवीदारांना न्याय मिळणार का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा !





