
अहिल्यानगरच्या सुपा येथून जेसीबी चोरीला गेला आणि या प्रकरणाचा धागा थेट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जाऊन पोहोचला. नेमक काय घडलं? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, पारनेर तालुक्यातील वाघुंडे येथील गणेश रासकर यांचा जेसीबी २६ सप्टेंबर रोजी सुपा येथील इंडियन ऑईल पेट्रोलपंपाच्या पार्किंगमधून चोरीला गेला होता. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. २२ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतलं.
विशाल दुबीले आणि प्रदीप सुकासे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पैठण तालुक्यातील शेकटा गावच्या शिवारात वीटभट्टीजवळ चोरीचा जेसीबी शोधून काढला. या प्रकरणात गौरव त्रिभुवन आणि संग्राम डरे यांनाही ताब्यात घेण्यात आलं.
या कारवाईत ३० लाखांचा जेसीबी आणि १३ लाखांची विनाक्रमांकाची क्रेटा कार, असा एकूण ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत. तुमच्या परिसरातही अशा चोरीच्या घटना घडल्या आहेत का? कमेंट करून नक्की सांगा.





