
अहिल्यानगर शहरात गुरुवारी दुपारी गोळीबाराच्या दोन घटनांनी खळबळ उडाली आहे. नेमक प्रकरण काय ? सगळं सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, सावेडीतील शिवनगर परिसरात फ्लॅटमध्ये घुसून एका महिलेवर गोळीबार करण्यात आला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणामागे एकतर्फी प्रेम असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय. कोर्ट गल्ली येथे राहणाऱ्या योगेश डोंगरे या तरुणाने हा गोळीबार केलाय.
विशेष म्हणजे याचं आरोपीने नंतर नगर तालुक्यातील रतडगाव मध्ये स्वतःवर गोळी झाडून घेतली ज्यात त्याच मृत्यू झाला. आधी भरदिवसा महिलेवर गोळीबार आणि त्यानंतर स्वतः गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या या प्रकरणाने अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमागे नेमकं कारण काय असावं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा !





