Latest

थोरात, काळे, मुळासह अहिल्यानगरमधील ‘या’ साखर कारखान्यांनी जाहीर केलेत उसाचे दर… कोणी दिला सर्वाधिक भाव?

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊस गाळपाचा हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला. तब्बल ३० लाख मेट्रिक टनांहून अधिक उसाचं गाळप झालंय. मात्र, अजूनही अनेक कारखान्यांनी उसाचा दर जाहीर केलेला नाही.

आतापर्यंत सात कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केलीय. पण कोणत्या साखर कारखान्याने किती दर जाहीर केलाय ? सांगतो. त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, थोरात आणि काळे कारखान्यांकडून प्रतिटन ३ हजार २०० रुपये, तर मुळा, ज्ञानेश्वर, अशोक, अगस्ती आणि घुले कारखान्यांकडून ३ हजार १०० रुपये दिले जाणार आहेत. पण शेतकरी संघटनांची मागणी आहे प्रतिटन ४ हजार रुपये! त्यामुळे या दरावरून संघर्षाची शक्यता वाढलीय.

विशेष म्हणजे, जिल्ह्यात आतापर्यंत २५ लाख क्विंटलपेक्षा जास्त साखरेचं उत्पादन झालंय. मात्र, साखरेचा उतारा केवळ ८.४ टक्के आहे. त्यात ढाकणे कारखान्याचा उतारा सर्वांत कमी ५.५७ टक्के आहे. आता उर्वरित ११ कारखाने किती दर जाहीर करणार?

जिल्हा बँकेच्या कर्जपुरवठ्याचा निर्णय काय होणार? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. तर मग मंडळी, तुमच्या मते शेतकऱ्यांना प्रतिटन ४ हजार रुपये मिळायला हवेत का? कमेंट करून नक्की सांगा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button