Latest

‘रामायण’ चित्रपटाचा अहिल्यानगरमध्ये विरोध… चित्रपटातील ही दृश्ये हटवण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रामायणाची कथा दाखवताना रावणाला महान ठरवलं जातंय आणि प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिरेखेचं अवमूल्यन होतंय ? ‘रामायण’ चित्रपटातील काही दृश्यांवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. नेमका काय आहे हा नवा वाद? जाणून घेऊयात. पण आधी अहिल्यानगर सिनेटॉल्कला फॉलो नक्की करा.

मंडळी, हिंदु जनजागृती समितीने चित्रपटातील काही दृश्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. ही दृश्ये मूळ वाल्मिकी रामायणातील कथानकाशी विसंगत असल्याचा दावा समितीने केला आहे.

चित्रपटात प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा, तर रावणाचे उदात्तीकरण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे निवासी जिल्हाधिकारी श्री. गीते यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळावीत आणि दुसरा भाग प्रदर्शित करण्यापूर्वी संत तसेच रामायणाच्या अभ्यासकांकडून चित्रपटाची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी बापू ठाणगे, सुरेखा सांगळे, अजिंक्य गायकवाड यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. तर मग मंडळी तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button