
संगमनेरच्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल २२४ कोटी ९४ लाख रुपयांची उपसा सिंचन योजना आता मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
या योजनेला हिरवा कंदील मिळाला, तर १५ गावांमधील सुमारे ९०० हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. नेमकी कशी आहे ही योजना? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी साकुर उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. साकूर, शिंदोडी, खरशिंदे, बिरेवाडी, मांडवे बुद्रुक यांसह १५ गावांचा या योजनेत समावेश आहे.
मुळा धरणाच्या जलाशयातून पाणी उचलून शेतीला उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे, पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळाले असून सर्वेक्षण आणि तांत्रिक कामेही पूर्ण झाली आहेत.
आमदार अमोल खताळ यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.
आता या प्रस्तावाला मंजुरी कधी मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर मग मंडळी या योजनेमुळे साकूर पठारचा पाणीप्रश्न सुटेल का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा !





