
भारतात फक्त एक सुपरबाइक खरेदी करण्यासाठी तब्बल ६० लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत ! होय, BMW Motorrad ने भारतात आपली नवी BMW M 1000 RR सुपरबाइक लॉन्च केली आहे.
या बाईकची एक्स-शोरूम किंमत आहे तब्बल ५९ लाख ९० हजार रुपये. विशेष म्हणजे, एवढ्या पैशांत मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्लॉटचं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं. आता या बाईकमध्ये असं काय खास आहे? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी या सुपरबाइकमध्ये ९९९ सीसीचं इनलाइन फोर इंजिन देण्यात आलं असून, ते तब्बल २१८ हॉर्सपॉवरची ताकद निर्माण करतं.
बाईकमध्ये कार्बन फायबर विंगलेट्स, नवीन फ्रंट फेअरिंग, स्लिक एबीएस प्रो आणि ब्रेक स्लाइड असिस्ट यांसारखी अत्याधुनिक फीचर्स आहेत.
विशेष म्हणजे, ही बाईक पूर्णपणे तयार स्वरूपात परदेशातून भारतात आयात केली जाणार आहे. एम कॉम्पिटिशन पॅकेजही स्टँडर्ड मिळणार आहे. तर मग मंडळी ६० लाखांत प्लॉट घ्याल की BMW ची ही सुपरबाइक? कमेंटमध्ये नक्की सांगा.





