Latest

अहिल्यानगरच्या ताजनापूर सिंचन योजनेला गती! मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी घोषणा; इतका निधी मंजूर !

ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा आता संपणार का? कारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या योजनेचं काम लवकरच पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. नेमकं काय घडलंय ? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, ताजनापूर योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या पुनरुज्जीवनासाठी २० कोटी ८८ लाख रुपये, तर तिसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणासाठी ६३ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे शेवगाव तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे २ हजार ७४४ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. विस्तारित पहिल्या टप्प्यात आणखी १३ गावांचाही समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली विखे पाटील यांचा सत्कार केला.

तसंच भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या ४६ गावांच्या पाणीप्रश्नावर नागपूर अधिवेशनात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. आता प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तर मग मंडळी तुम्हाला या सिंचन योजनेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button