Latest

‘क्लेरा ब्रुस’ची मोक्याची जागा हडपण्याचा डाव? राज्यभर चर्चेत आलेलं प्रकरण नेमकं काय…

अहिल्यानगरच्या ऐतिहासिक क्लेरा ब्रुस हायस्कूलला कुलूप लावण्याची वेळ आलीय. ही तीच १८१३ मध्ये स्थापन झालेली शाळा आहे, जिथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १८४६-४७ मध्ये शिक्षणाचे धडे गिरवले होते.

सध्या शिक्षण विभागाने ‘पटसंख्या कमी’ असल्याचे कारण देत इथल्या शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन केले आहे आणि शाळेचा यू-डायस क्रमांक रद्द करण्याचे पत्रही काढले आहे. या कारवाईमागे नेमकं राजकारण काय आहे?

मराठी मिशनच्या अध्यक्षा डॉ. विजया जाधव, माजी विद्यार्थी संघटना आणि ‘मिस् सिंथिया फॅरार शाळा बचाव अभियाना’च्या सदस्यांनी यामागे एक गंभीर संशय व्यक्त केला आहे.

क्लेरा ब्रुस हायस्कूल आणि बॉईज हायस्कूल या दोन्ही शाळांच्या प्रांगणाच्या बरोबर मध्यातून एक प्रस्तावित रस्ता जाणार आहे. आणि याच रस्त्यासाठी ही कोट्यवधींची मोक्याची जागा हडप करण्याचा हा डाव तर नाही ना, असा थेट सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे हा प्रश्न भविष्यात जास्त चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button