Latest

जानेवारीत कारप्रेमींसाठी मोठा धमाका ! Hyundai, Mahindra अन् Tata आणणार ‘या’ ३ भन्नाट SUV!

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कार खरेदीचा विचार करताय? मग थोडं थांबा! कारण जानेवारी २०२७ मध्ये भारतीय बाजारात तीन नव्या गाड्यांची एंट्री होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे यामध्ये दोन इलेक्ट्रिक गाड्यांचाही समावेश आहे. जानेवारीत कोणत्या तीन गाड्या लॉन्च होणार? सांगतो पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24ला फॉलो नक्की करा.

यात पहिली गाडी आहे Hyundai Ioniq P. ही कंपनीची भारतातील पहिली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार असू शकते. चार मीटरपेक्षा कमी लांबी आणि आकर्षक डिझाइन ही तिची खासियत असेल. १६ जानेवारीला तिचं अनावरण होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, Mahindra आपली Vision S SUV सादर करू शकते. यात पॅनोरामिक सनरूफ, ३६० डिग्री कॅमेरा, लेव्हल २ ADAS आणि पेट्रोल-डिझेल इंजिनचे पर्याय मिळण्याची अपेक्षा आहे.

तर तिसरी गाडी म्हणजे Tata Safari EV! ही टाटाची पहिली सात आसनी इलेक्ट्रिक SUV ठरू शकते. मोठ्या कुटुंबांसाठी हा पर्याय खास असणार आहे.

मात्र या गाड्यांच्या अधिकृत किमती अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. तर मग मंडळी तुम्हाला यातील कोणती गाडी आवडली? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button