
स्वतःचा पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करायचाय मग महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
या योजनेत ३ हजार ते ५ हजार पक्ष्यांचे ब्रॉयलर युनिट उभारण्यासाठी अनुदान दिले जाते. नेमकी कशी आहे ही योजना? सांगतो पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24ला फॉलो नक्की करा.
मंडळी, या योजनेत ३ हजार पक्ष्यांच्या प्रकल्पाची किंमत १२ लाख असून सर्वसाधारण प्रवर्गाला ५० टक्के म्हणजे ६ लाख रुपये, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाला ७५ टक्के म्हणजे ९ लाख रुपये अनुदान मिळत.
तर ५ हजार पक्ष्यांच्या प्रकल्पाची किंमत १९ लाख रुपये असून सर्वसाधारण प्रवर्गाला ९ लाख ५० हजार, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाला १४ लाख २५ हजार रुपये अनुदान मिळत.
यामध्ये शेड बांधकाम, खाद्य-पाण्याची भांडी आणि आवश्यक सुविधांचा समावेश आहे. अर्जदाराकडे किमान २० गुंठे जमीन किंवा पात्र नोंदणीकृत भाडेपट्टा, तसेच दोन वर्षांचा अनुभव किंवा मान्यताप्राप्त प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे. अर्ज आणि कागदपत्रांच्या माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधा.





