Latest

कांद्याने केला वांदा… अहिल्यानगरच्या ‘या’ मार्केटमध्ये कांदा बाजारभावात मोठी घसरण !

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे ! राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याची आवक वाढली आणि कांद्याच्या दर्जानुसार भावात पण मोठी तफावत पाहायला मिळाली. कांद्याला सर्वाधिक ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत कांद्याच्या एकूण २ हजार ९१ गोण्यांची आवक झाली. यामध्ये एक नंबरच्या कांद्याला ३ हजार १०० ते ४ हजार २०० रुपये, तर दोन नंबरच्या कांद्याला २ हजार ते ३ हजार ५० रुपये भाव मिळाला.

तीन नंबरच्या कांद्याचे दर १ हजार ते १ हजार ९५० रुपयांपर्यंत राहिले. गोल्टी कांद्याला १ हजार ३०० ते २ हजार ६०० रुपये, तर जोड कांद्याला ५०० ते १ हजार रुपये दर मिळाला.

दरम्यान, डाळिंबाच्या ४ हजार २२७ क्रेट्सची आवक झाली. प्रथम दर्जाच्या डाळिंबाला २०१ ते ३५५ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. संत्री आणि सीताफळालाही बाजारात दर मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनो, माल विक्रीपूर्वी दर्जानुसार बाजारभाव तपासा!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button