
शेतकऱ्यांनो, येणारं वर्ष शेतीसाठी किती कठीण ठरू शकतं, याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. कारण प्रशांत महासागरातील एल-निनो प्रणाली अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोलंबिया विद्यापीठाच्या इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अंदाजानुसार, फेब्रुवारी २०२७ पर्यंत एल-निनो स्थिती निर्माण होण्याची शक्यता १०० टक्के आहे. एवढंच नाही, तर २०२६-२७ च्या हिवाळ्यात ही प्रणाली अति तीव्र होऊ शकते, असा अंदाज आहे.
मग याचा भारतातील पावसावर काय परिणाम होणार? तर मंडळी, एल-निनोमुळे काही वर्षांत मान्सून कमकुवत होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पावसाचं प्रमाण, पेरणी, पिकांची वाढ आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
मात्र, पुढच्या वर्षी नेमका किती पाऊस पडेल, हे आत्ताच निश्चित सांगता येणार नाही. दरम्यान, महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम आहे. मालेगावमध्ये तापमान ३८.४ अंशांवर पोहोचलं आहे. तरीही शेतकऱ्यांनी घाबरू नये ; हवामान विभागाचे पुढील अंदाज लक्षात ठेवा आणि शेतीचं नियोजन काळजीपूर्वक करा.





