Latest

ना ताफा, ना लवाजमा ! आमदार अमोल खताळांच्या दुचाकीवरून पालकमंत्री विखे पाटील गणरायाच्या दर्शनाला ! विखे पाटलांचा साधेपणा चर्चेत

संगमनेरात बुधवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध गणेश मंडळांना भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी नेहमीचा शासकीय वाहनांचा ताफा सोडून त्यांनी दुचाकीवरून प्रवास केला. आमदार अमोल खताळ हे मोटारसायकल चालवत होते.

चंद्रशेखर चौक, सुतार गल्ली, नेहरू चौक, जय जवान चौक, विद्यानगर यासह विविध गणेश मंडळांच्या मंडपांना विखे पाटील यांनी भेट दिली. त्यांनी गणरायाची आरती केली आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांशी तसेच गणेशभक्तांशी संवाद साधला.

यानंतर सुकेवाडी येथील महागणपती आणि महावितरण कार्यालयातील शम्मी गणपतीचेही दर्शन घेत महाआरती करण्यात आली.
शासकीय गाड्यांचा लवाजमा बाजूला ठेवून दुचाकीवरून थेट गणेशभक्तांमध्ये मिसळल्याने विखे पाटील यांच्या या साधेपणाची संगमनेरात चर्चा रंगली. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्येही यावेळी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button