Latest

अहिल्यानगर ब्रेकिंग : गणेश विसर्जन मिरवणुकीत नियम मोडणाऱ्या मंडळांना दणका…; ‘या’ मंडळांचे साऊंड सिस्टिम आणि डीजे पोलिसांच्या ताब्यात !

अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही गणेश मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली. मिरवणूक शांततेत आणि नियमांच्या चौकटीत पार पडावी, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, काही मंडळांकडून नियमबाह्य पद्धतीने मोठ्या क्षमतेच्या साऊंड सिस्टिमचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी संबंधित मंडळांवर कारवाई करत त्यांचे डीजे आणि साऊंड सिस्टिम ताब्यात घेतले.

विशेष म्हणजे, ज्या मंडळाकडून चार बेस आणि चार टॉप लावण्यात आले होते, त्या मंडळाचे साऊंड सिस्टिमही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

या कारवाईमुळे विसर्जन मिरवणुकीत काही काळ खळबळ उडाली. मात्र, नियमांचे पालन करून मिरवणूक पार पाडण्याचा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला.

विसर्जन मिरवणुकीत उत्साहासोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button