Latest

मुळा उजव्या कालव्याचा भराव खचला सुदैवाने हानी टळली / प्रशासन अलर्ट मोडवर

गणरायाच्या कृपेने गाव सुरक्षित --- आमदार लंघे सर्व वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल

चांदा ( वार्ताहर ) मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असतानाच नेवासा तालुक्यातील चांदा गावाच्या बसस्थानकाजवळच कालव्याचा भराव मोठ्या प्रमाणावर खचल्याने अचानक ग्रामस्थ व प्रशासनाची धावपळ उडाली . मात्र सुदैवाने प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतल्याने होणारी मोठी दुर्घटना टळली .

आमदार विठ्ठलराव लंघे यांनी या संदर्भात नामदार विखे पाटील यांना संदर्भात माहिती दिली व ते पुढे म्हणाले की ऐन गणेश विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पाच संकटाला धावुन आले आणि पुढील अनर्थ टळ्ला असे मत या वेळी आमदार लंघे यांनी व्यक्त केले .

चांदा गावाला जवळूनच मुळा उजवा कालवा जातो .सध्या मुळा उजव्या कालव्याला शेतीसाठीची आवर्तन चालू असल्याने चांदा गावाजवळ साडेअकराशे ते बाराशे क्युसेस पाण्याचा प्रवाह सुरू होता . त्यामुळे मुळा उजवा कालवा दुथडी भरून वाहत होता . धरणातून कालव्यामध्ये जवळपास पंधराशे क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे . विसर्ग वजा जाता गावाजवळ जवळपास साडेअकराशे क्युसेस पाण्याचा प्रवाह सुरू होता . मात्र गावातील पुलाजवळ बस स्थानकाच्या समोर दोनशे ते तीनशे फूट अंतरावर असलेल्या या कालव्याचा भराव दुपारपासूनच हळूहळू खचू लागला होता .

सायंकाळी तीन चार वाजेच्या दरम्यान ही घटना काही ग्रामस्थ व पाटबंधारे विभागाचे कालवानिरीक्षक श्रीकाकडे यांच्या लक्षात आली . त्यांनी तातडीने सदर माहिती वरिष्ठांना कळवली घोडेगाव विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता भराव मोठ्या प्रमाणावर खसल्याचे निदर्शनास आले . पाणी मात्र दुथडी भरून वाहत असल्याने धोक्याची परिस्थिती निर्माण झाली होती .

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अहिल्यानगर पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंता सायली पाटील व इतर अधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती देण्यात आली . त्याचबरोबर नेवासा तहसीलदार संजय बिरादार सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे शनिशिंगणापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिपक धनवटे यांनाही संबंधित घटनेची माहिती देण्यात आली .

सर्वच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले . परीस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत प्रथम सर्व चाऱ्याना तसेच आऊलेट उपलब्ध असतील अशा सर्व ठिकाणी पाणि सोडण्यात आले . चांदा , बऱ्हाणपूर रस्तापूर वडाळा गावांमध्ये ग्रामपंचायत ध्वनीक्षेपावरून धोक्याची सुचना देत नागरिकांनी जनावरांसह सुरक्षित ठिकाण जाण्याचे आवाहन केले .सोशल मिडीयातूनही चांदा सह सर्व गावांत प्रशासनाने मेसेज पाठवले . त्यामुळे ग्रामस्थ सतर्क झाले . शेकडो युवक घटनास्थळी परिस्थिती पाहण्यासाठी गेले . सोनई व शनिशिंगणापूर पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवत शांततेत परीस्थिती हाताळली . पाटबंधारे विभागाने तातडीने मशिनरी बोलावुन उपाययोजना सुरू केल्या . रात्री नऊ पर्यंत बरेचसे पाणि कमी झाल्याने धोका टळला आणि हळूहळू ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मात्र रात्री दोन वाजेपर्यंत मुख्य अधिकारी सायली पाटिल यांच्यासह घोडेगाव विभागाचे सर्व अधिकारी घटनास्थळी हजर होते . दरम्यान आज सकाळीच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून सकाळपासूनच मुख्य अभियंता सायली पाटिल , मुख्य अभियंता प्रविण दहातोंडे , घोडेगाव विभागाचे अभियंता एस .बी. पवार ,पी.एस खडसे कालवा निरीक्षक श्री काकडे तळ ठोकून होते .

दरम्यान दुपारी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी घटनास्थळाला भेट देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना देत दुरुस्तीनंतर आवर्तन तातडीने सुरू केले जाईल असे सांगीतले . मात्र अनंत चतुर्थीचीच्या दिवशी गणरायाला निरोप देता देता चांदा आणि परिसरातील गावांवर आलेले संकट गणरायाच्या कृपेनेच टळले अशी भावना आमदार विठ्ठलराव लंघे यांनी व्यक्त केली. जर कालवा फुटला असता तर फार मोठे संकट ओढवले असते असे अनेक ग्रामस्थ म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button