Latest

दिल्लीतून आली मोठी बातमी! विखेंचा अमित शाहांसोबत मोठा मास्टरस्ट्रोक! ‘हा’ प्रकल्प दुष्काळ कायमचा संपवणार?

राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी शनिवारी नवी दिल्लीत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली. विषय गंभीर होता..!

महाराष्ट्रावर असलेलं दुष्काळाचं सावट, राज्यातील पाणीटंचाई आणि आपल्या बळीराजाचे, म्हणजेच शेतकऱ्यांचे प्रश्न यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी ‘नदीजोड प्रकल्पांना’ गती देण्यासाठी आणि केंद्राकडून भरीव आर्थिक मदत मिळवण्यासाठी विखे पाटील यांनी अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी केली.

या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सकारात्मक पवित्रा दाखविल्याचे सांगितले जात आहे. नदीजोड प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटू शकतो. तुम्हाला काय वाटतं, या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा दुष्काळ संपेल का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button