Latest

अहिल्यानगर हादरलं ! विळद घाटातील वृद्धाश्रमात पहाटे रक्तरंजित थरार…..दोन जणांचा मृत्यू, सहा जण गंभीर ! नेमक काय घडलं ? पहा….

अहिल्यानगरच्या विळद घाट परिसरातून पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना समोर आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मातोश्री वृद्धाश्रमात अज्ञात कारणावरून भीषण प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती आहे.

पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ला नेमका कोणी केला? त्यामागचं कारण काय? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा सुरू असून, प्रत्यक्षदर्शी आणि वृद्धाश्रम व्यवस्थापनाकडून माहिती घेतली जात आहे.

दरम्यान, हल्ल्याचं नेमकं कारण आणि संशयिताबाबत तपासातून काय समोर येतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button