Latest

हातात ढोल, समोर हजारो गणेशभक्त…; अमोल खताळांच्या ठेक्याने संगमनेर दुमदुमलं ! आमदार साहेबांचा अनोखा अंदाज व्हायरल…

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने संगमनेर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक वाद्ये आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले.

यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून सलग तिसऱ्या वर्षी गणेश मंडळांसाठी विशेष स्वागत कक्ष उभारण्यात आला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध गणेश मंडळांचे स्वागत करून प्रत्येक मंडळाचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

विशेष म्हणजे, मंडळांचे स्वागत करताना आमदार अमोल खताळ यांनी स्वतः ढोल वाजवत गणेशभक्तांचा उत्साह वाढवला. त्यांच्या ढोलवादनाला उपस्थित गणेशभक्तांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गणेशोत्सवातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश देत वर्षभर सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविणाऱ्या मंडळांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम असल्याचे सांगण्यात आले.

सलग तिसऱ्या वर्षीच्या या स्वागत उपक्रमामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button