
अहिल्यानगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अत्याचारातून जन्मलेल्या अवघ्या एक-दोन दिवसांच्या नवजात बाळाला थेट बायपास रस्त्यालगत सोडून देण्यात आलं.
या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत तिघांना अटक केली आहे. नेमकं काय घडलंय? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, ८ नोव्हेंबर रोजी बाराबाभळी शिवारातील बायपास रस्त्यालगत एका बाभळीच्या झाडाखाली हे नवजात पुरुष अर्भक बेवारस अवस्थेत आढळलं होतं. माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासात एका तरुणाने पीडितेवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचं समोर आलं. या प्रकरणात किरण वाघमारे, ३६ वर्षीय तरुणी आणि इरफान शेख अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी अर्भक आणि पीडितेचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठवले असून, बाळाला सोडण्यासाठी वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे.
या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहेत. तर मग मंडळी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.





