Latest

अहिल्यानगरमध्ये आरोग्याचा मोठा अलर्ट….; ६ महिन्यांत ‘या’ आजाराचे लाखो रुग्ण, आकडा आणखी वाढणार? आरोग्य विभागाची स्पेशल मोहीम सुरु

अहिल्यानगर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या तपासणीत समोर आलेला आकडा धक्कादायक आहे ! गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३ लाख ४२ हजार ३५२ नागरिकांमध्ये उच्च रक्तदाब आढळला आहे. तर १ लाख ९८ हजार ५२३ जणांना मधुमेह असल्याचे तपासणीत समोर आले आहे.

राज्य शासनाच्या ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात ३० वर्षांवरील नागरिकांची १०० दिवसांची विशेष आरोग्य तपासणी मोहीम सुरू आहे. १ सप्टेंबर ते १० डिसेंबरदरम्यान तब्बल २६ लाख ४७ हजार ७३७ नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या मोहिमेत उच्च रक्तदाब, मधुमेह, तंबाखू सेवनामुळे होणारे धोके आणि इतर असंसर्गजन्य आजारांवर लक्ष दिले जात आहे. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेह अनेकदा सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दाखवत नाहीत.

त्यामुळे ३० वर्षांवरील नागरिकांनी स्वतःसोबत कुटुंबातील सदस्यांचीही आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button