Latest

बैलगाडी एकटीच घरी परतली… मालकाचा शोध घेताच समोर आलं दुर्दैवी सत्य ! कर्जत तालुक्यातील हृदयद्रावक घटना

कर्जत तालुक्यातील मानेवाडी येथे मंगळवारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात हृदयद्रावक घटना घडली. प्रल्हाद बाळासाहेब कानगुडे या २७ वर्षीय तरुणाचा वीज पडून जागीच मृत्यू झाला.

प्रल्हाद गुरांसाठी चारा आणण्यासाठी बैलगाडी घेऊन शेतात गेला होता. काम सुरू असतानाच अचानक पावसाला सुरुवात झाली.

पावसाचा जोर वाढल्याने त्याने बैलगाडी शेतातच सोडली आणि पावसापासून बचाव करण्यासाठी जवळच्या झाडाचा आसरा घेतला. मात्र, याच झाडावर वीज कोसळल्याने प्रल्हादचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, काही वेळाने शेतात सोडलेली बैलगाडी एकटीच घरी परतली. प्रल्हाद सोबत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. अखेर शेतात त्याचा मृतदेह आढळला.

घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाने कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. घटनेचा पंचनामा करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button