Latest

अल निनोचा कहर… पुढील ६ महिने धोक्याचे; उष्णतेमुळे जगभरात साडेचार लाख लोकांचा मृत्यू होणार ? भारताचा आकडा तर फारच धक्कादायक !

प्रशांत महासागरात विकसित होत असलेल्या अल निनोमुळे सप्टेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या काळात जगातील अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

क्लायमेट इम्पॅक्ट लॅबच्या विश्लेषणानुसार, या काळात सरासरी वर्षाच्या तुलनेत जगभरात ४ लाख ५१ हजारांहून अधिक अतिरिक्त उष्णतासंबंधित मृत्यू होण्याचा अंदाज आहे.

यामध्ये भारतासाठीही चिंताजनक आकडा समोर आला आहे. भारतात सुमारे १५ हजार ८०० हून अधिक अतिरिक्त मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हा आकडा प्रत्यक्ष मृत्यूंची भविष्यवाणी नसून, १९९६ ते २०२५ या कालावधीतील सरासरी परिस्थितीच्या तुलनेत अपेक्षित अतिरिक्त मृत्यू दर्शवतो.

WMO नुसार अल निनोची तीव्रता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील उन्हाळ्यात भारतात उष्णतेचा धोका आणखी वाढू शकतो. त्यामुळे उष्णतेचे इशारे, पाणी, कुलिंग सेंटर्स आणि आरोग्य सुविधा यांची तयारी महत्त्वाची ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button