
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे ! १५ ऑक्टोबरपासून UPI पेमेंटच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल होणार आहे. मंडळी, २,००० पेक्षा जास्त रकमेच्या काही व्यक्ती-ते-व्यापारी UPI व्यवहारांवर ०.४ टक्के MDR लागू होणार आहे.
विशेष म्हणजे, या MDR वर १८ टक्के GST आकारला जाणार आहे. मात्र हा GST संपूर्ण पेमेंटवर नसून केवळ MDR रकमेवर लागू होईल.
उदाहरणार्थ, १० हजारांच्या व्यवहारावर ०.४ टक्के म्हणजे ४० रुपये MDR असेल. त्यावर १८ टक्के GST म्हणजे ७.२० रुपये आकारले जातील.
दरम्यान, या १८ टक्के GST चा आढावा घेण्याची शक्यता GST परिषदेकडून व्यक्त करण्यात आली आहे. GST कमी होणार की रद्द होणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
महत्त्वाचं म्हणजे १५ ऑक्टोबरपासून MDR लागू करण्याच्या तारखेत बदल होणार नसल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
NPCIच्या माहितीनुसार, सुमारे ९६ टक्के UPI व्यापारी व्यवहार २ हजारांपेक्षा कमी रकमेचे आहेत. तसेच महिन्याला १ लाखांपर्यंत UPI कलेक्शन असलेल्या छोट्या व्यवसायांना MDR मधून सूट मिळणार आहे.





