Latest

शनिशिंगणापूरातील खुनी प्रकरणात न्यायालयाचा मोठा निकाल ! आठ वर्षानंतर न्यायालयाने काय शिक्षा सुनावली ?

२०१८ मध्ये शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनी हल्ला प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. नेवासा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी आदिनाथ कडूभाऊ शिंदे याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

२८ सप्टेंबर २०१८ रोजी वादातून ज्ञानेश्वर अशोक कोकाटे यांच्यावर चाकूने मानेवर जीवघेणा वार करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि घातक हत्याराने गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

न्यायालयीन सुनावणीत भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ आणि ३२६ अंतर्गत आरोपीवरील आरोप सिद्ध झाले. न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीसोबत दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी तीन महिने साधी कैद भोगावी लागणार आहे.

या खटल्याचा निकाल ३ सप्टेंबर २०२६ रोजी लागला. कोर्ट पैरवी अधिकारी व्ही. ए. पिंपळे यांनी साक्षीदारांना न्यायालयात हजर ठेवत महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button