
पुण्यातून तरुणाचं अपहरण… आणि समृद्धी महामार्गावर पोलिसांचा तब्बल ३ किलोमीटर थरारक पाठलाग आणि सतर्क पोलिसांमुळे अपहरणाचा कट उधळला गेला.
मंडळी, २ सप्टेंबरला पुण्याच्या चिखली परिसरातून २४ वर्षीय आरशद शकील अहमद सिद्दीकी याचं अपहरण झाल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी समृद्धी महामार्गाच्या नियंत्रण कक्षाला दिली.
अर्टिगा कारमधून तरुणाला उत्तर प्रदेशच्या दिशेने नेलं जात असल्याची माहिती मिळताच बाभळेश्वर महामार्ग पोलिसांनी शोध सुरू केला. चॅनल क्रमांक ५२३ जवळ संशयित कार दिसताच पोलिसांनी तिचा पाठलाग सुरू केला.
तब्बल तीन किलोमीटरनंतर चॅनल क्रमांक ५२० जवळ कार अडवण्यात आली. कारमधून महमद अन्वर सिद्दीकी, निजामुद्दीन सिद्दीकी, फाजील हुसेन सिद्दीकी, महंमद साहील सिद्दीकी, महंमद सिद्दीकी इमामुद्दीन सिद्दीकी आणि सायमा खातून सिद्दीकी यांना ताब्यात घेण्यात आलं.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विक्रान्त कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. ठोंबरे, महेश बोरुडे, रामचंद्र साळुंके, प्रवीण पालवे, रोहित आरवडे आणि शिंदे यांच्या पथकाने केली.





