Latest

डॉ. सुजय विखे पाटील यांचा अनोखा अंदाज ; शिर्डीतील दहीहंडीच्या कार्यक्रमात अचानक इंट्री अन ‘मै हूं डॉन’…

शिर्डीत गोकुळाष्टमीनिमित्त आयोजित दहीहंडी उत्सवात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सहभागी होत तरुणाईचा उत्साह वाढवला. ‘मै हूं डॉन’ या गाण्यावर त्यांनी मनसोक्त ठेका धरला आणि उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाची लाट पाहायला मिळाली.

राजकारणातील गंभीर भूमिकेपेक्षा उत्सवाच्या वातावरणात त्यांचा हा साधा आणि उत्स्फूर्त अंदाज चर्चेचा विषय ठरला. कार्यकर्त्यांमध्ये मिसळणे, सर्वसामान्यांच्या घरी जाऊन जमिनीवर बसून भोजन करणे, तसेच विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे, ही त्यांची शैली समर्थकांकडून आवर्जून सांगितली जाते.

शिर्डीतील दहीहंडी सोहळ्यातही याच साधेपणाची झलक पाहायला मिळाली. त्यांच्या सहभागामुळे बालगोपालांसह तरुणांचा उत्साह आणखी वाढला. त्यामुळे यंदाची शिर्डीतील दहीहंडी केवळ हंडी फोडण्यासाठी नव्हे, तर सुजय विखे यांच्या अनोख्या अंदाजामुळेही लक्षवेधी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button