
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कांद्याचा बाजारभाव हंगामातील विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. काही महिन्यांपूर्वी 500 – 600 रुपये प्रति क्विंटलने विकला जाणारा कांदा आता साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे.
सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी कांद्याची तब्बल १५ हजार ५८२ क्विंटल आवक झाली. एवढी मोठी आवक असतानाही कांद्याच्या दरात चांगली तेजी पाहायला मिळाली.
इथं उत्कृष्ट प्रतीच्या कांद्याला कमाल ६५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सरासरी दर राहिला ३४०० रुपये, तर किमान दर ५०० रुपये होता. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून दर सातत्याने वर जात आहेत.
३० ऑगस्टला कमाल दर होता ५३०० रुपये…, ३१ ऑगस्टला ५५००…, २ सप्टेंबरला ६०००…, ३ सप्टेंबरला ६४००…आणि आता थेट ६५०० रुपये!
या मार्केटमध्ये पुणे, बीड, अहिल्यानगर आणि सोलापूरच्या विविध भागांतून कांदा दाखल होत आहे. आता खरी उत्सुकता हीच—कांद्याचा हा वाढता भाव आणखी वर जाणार, की पुन्हा घसरणार? तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये व्यक्त व्हा.





