Explained

अमेरिकेसोबत चीनमधूनही महत्त्वाचे शास्त्रज्ञ गायब; जगाला नष्ट करण्याचं भयंकर षडयंत्र होतंय?

गेल्या आठवड्यात आम्ही अमेरिकेच्या 10 शास्त्रज्ञांच्या गुढ मृत्यूबाबत एक व्हिडीओ केला होता. त्याची लिंक कमेंट बाँक्समध्ये दिलीय. आता आम्हाला पुन्हा असाच एक धक्कादायक व्हिडीओ करावा लागतोय. जगात असं काही घडतंय, ज्यामुळे संपूर्ण जगाची झोप उडालीय. अमेरिकेतून जसे महत्त्वाचे शास्त्रज्ञ गायब झालेत, अगदी तसेच चीनचेही काही शास्त्रज्ञ गायब झालेत. विशेष म्हणजे या दोन्ही देशांतील शास्त्रज्ञ गायब होणं, त्यानंतर त्यांचा मृत्यू होणं, किंवा अगदी ते बेपत्ता होणं, या सगळ्या घटनांमध्ये काहीतरी साम्य आढळतंय.

अमेरिका व चीन हे दोन्ही देश या घटनांचा आपापल्या पातळीवर तपास करत आहेत, परंतु हे एक जागतीक षडयंत्र आहे का? की कुणी थेट जगाला संपवायला निघालंय? हा प्रश्न पडलाय. शास्त्रज्ञांच्या गायब होण्याबाबत ज्या बातम्या जगभर सुरु झाल्यात, त्या पाहिल्यावर किंवा ऐकल्यावर काळजाचा ठोका नक्कीच चुकतोय. बरं, जे शास्त्रज्ञ गायब झालेत, त्यातील अनेकजण अणु बाँम्बसारख्या शोधांवरही काम करत होते. अमेरिका व चीन या प्रगत देशांतील महत्त्वाचे लोक जर गायब होत असतील किंवा त्यांचा मृत्यू होत असेल तर हे चिंता करण्यासारखं नक्कीच आहे.

अमेरिका आणि चीनमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. या दोन्ही देशांतील वृत्तपत्रे किंवा प्रसारमाध्यमे सध्या एका महत्त्वाच्या बातमीचं अॅनलिसीस करण्यात गुंतले आहेत. या दोन्ही देशात अशी घटना घडलीय ज्यामुळे जगभरात चिंता पसरलीय. या दोन्ही देशांतील काही नामवंत शास्त्रज्ञांचा एकामागून एक संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झालाय. एका अहवालानुसार, या दोन्ही देशांतील तब्बल 20 शास्त्रज्ञांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला किंवा ते बेपत्ता झाले आहेत. अमेरिकेतली बातम्यांनुसार, तेथील 11 शास्त्रज्ञ बेपत्ता झाल्याचे किंवा असामान्य परिस्थितीत मृत आढळल्याचे वृत्त आहे. त्याबाबत आम्ही यापूर्वी एक व्हिडीओही केला होता.

आता चीनमधूनही अशीच बातमी समोर येत आहे. चीनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, हायपरसॉनिक शस्त्रे, अणु तंत्रज्ञान आणि अंतराळ संरक्षण यांसारख्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या नऊ शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला आहे. आता या दोन्ही घटना वरवर पाहिल्या तर सामान्य वाटतील. पण… पण तसं नाही. या दोन्ही घटनांमध्ये बरंच साम्य आहे. हे दोन्ही देश वेगवेगळे असले तरी, गेल्या चार-सहा वर्षांत या दोन्ही देशांतील महत्त्वाच्या व्यक्ती गायब झाल्या आहेत. त्यामुळे यामागे काही जागतिक षडयंत्र आहे का, हा प्रश्न पडला आहे.

अमेरिकेतून जे शास्त्रज्ञ गायब झाले किंवा ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यात नासाचे अभियंते, हवाई दलाचे जनरल आणि लाँस अँलमाँससारख्या अणु प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांचा समावेश होता. त्यापैकी सर्वात चर्चेत आले प्रकरण हे मेजर जनरल नील मॅकॅसलँड यांचे होते. मॅकँसलॅण्ड हे युएफओ म्हणजेच, अज्ञात उडणाऱ्या वस्तूंचे आभ्यासक होते. अमेरिका हवाई दलाच्या संशोधन प्रयोगशाळेचे कमांडरही होते.

फेब्रुवारी 2026 मध्ये ते अचानक बेपत्ता झाले. ते आजपर्यंत सापडले नाहीत. यांच्यासारखीच नासाची जेट इंजिनीअर मोनिका रेझाही गायब झालीय. कॅलिफोर्नियाच्या जंगलात मित्रांसोबत फिरायला गेलेली मोनिका त्या जंगलातून अचानक गायब झालीय. तीही आत्तापर्यंत सापडलेली नाहीए. याशिवाय नासाच्या अणु-प्रणोदन प्रकल्पावरील अभियंता जोशुआ लब्लॅक, लाँ, अँलामाँस अणु प्रयोगशाळेतील प्रशासकिय सहाय्यक मेलिना कॅसियास, निवृत्त शास्त्रज्ञ अँथनी चावेझ हेही गायब झालेत. अमेरिकेतील इतर सहा महत्त्वाच्या शास्त्रज्ञांचा गुढ मृत्यूही झालाय.

अमेरिकेचे नेते एरिक बर्लिसन यांनी या प्रकरणात काही शंका उपस्थित केल्यानंतर जगभरात या घटनांची चर्चा झाली. बर्लिसन यांच्या मते, हा योगायोग नक्कीच नाही. त्यामागे एखादे षडयंत्रही असण्याची शक्यता आहे. या प्रकरणांची चर्चा वाढल्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ही बाब गांभीर्याने घेतली. आता एफबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.

अगदी अशाच घटना चीनमध्येही घडल्याचे समोर आलेय. चीनमधील तब्बल 9 महत्त्वाच्या शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला किंवा ते गायब झाले आहेत. या चिनी शास्त्रज्ञांचं वय हे 26 ते 68 या दरम्यान आहे. त्यातील बहुतेक प्रकरणांमध्ये शास्त्रज्ञांच्या मृत्यूचे कारण अपघात, आजार किंवा अज्ञात असल्याचे समोर आले आहे. मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स तज्ज्ञ चेन शुमिंग, रसायनशास्त्रज्ञ झोउ ग्वांग युआन, अंतराळ तज्ञ झांग शियाओशिन आणि हायपरसॉनिक्स तज्ञ फांग डिंगटिंग यांचे अचानक संदिग्ध अवस्थेत निधन झाले. तज्ञांच्या मते, बहुतेक घटनांमध्ये हायपरसॉनिक तंत्रज्ञान, लष्करी एआय आणि प्रगत शस्त्रास्त्रे यांचा समावेश आहे. चीनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रातील शास्त्रज्ञांबाबत ही धक्कादायक प्रकरणे घडली आहेत.

चीनमध्ये नेमकं काय घडलंय, हे समजून घेऊयात…

– चीनमध्ये 38 वर्षीय प्राध्यापक फेंग यांगहे यांचं जुलै 2023 मध्ये एका कार अपघातात निधन झालं. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेंन्स टेक्नाँलाँजीमध्ये ते एआय माँडेल विकसीत करत होते. त्यांच्या अपघाबाबत त्यावेळीही शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. कारण हा अपघात मध्यरात्री झाला होता.
– याशिवाय 57 वर्षीय मायक्रो इलेक्ट्रिक तज्ज्ञ चेन शुमिंग यांचाही 2018 मध्ये अशाच शंकास्पद कार अपघातात मृत्यू झाला होता.
– चीनचे अंतराळतज्ज्ञ झांग शियाओशिन यांचाही डिसेंबर 2024 मध्ये कार अपघातात मृत्यू झाला.
– हायपरसोनिक तज्ज्ञ फांग डाइनिंग यांचा फेब्रुवारी 2026 मध्ये संदीग्घ मृत्यू झाला.
– याशिवाय हायपरसोनिक संशोधक यान हाँग यांचे मार्च 2026 मध्ये एका दुर्मिळ आजाराने निधन झाले.

अमेरिका व चीन या दोन्ही देशांच्या तपास यंत्रणा या 20 घटनांची सखोल चौकशी करत आहेत. तपास यंत्रणांना या प्रकरणांमध्ये एक समान धागा आढळून येत आहे. या घटनांमध्ये सामील असलेले बहुतेक शास्त्रज्ञ अणुविज्ञान, अंतराळ आणि प्रगत तंत्रज्ञान यांसारख्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमध्ये कार्यरत होते. यांपैकी काही शास्त्रज्ञ नासा, एमआयटी आणि लॉस अॅलॅमॉस नॅशनल लॅबोरेटरी यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांशी संबंधित होते.

या घटनांचं गांभीर्य तेव्हा वाढलं जेव्हा तपासकर्त्यांना असे आढळून आलं की, अनेक शास्त्रज्ञांचा डेटा आणि संशोधनाचे निष्कर्ष त्यांच्या बेपत्ता होण्यापूर्वीच डिजिटल स्वरूपात पुसून टाकण्यात आले होते किंवा चोरण्यात आले होते. एकीकडे चीन, रशीया आणि इराण अणुउर्जा, अंतराळ आणि प्रगत शस्त्रांसासाठी जंगजग पछाडत असताना चीन आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञ गायब होणं, ही साधारण बातमी नक्कीच नाही. हा एक जागतीक कट असल्याचं काहींच म्हणणं आहे. परंतु त्याबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा या दोन्ही देशांना सापडलेला नाही. हे सगळं संशयास्पद आहे, हे मात्र नक्की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button