
महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे शिक्षेच्या आदेशाविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केवळ एकदाच अपील करता येणार आहे.मंडळी, ही बातमी तुम्ही पाहताय, पण त्याआधी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी AhilyanagarLive24 ला फॉलो करायला विसरू नका!
महाराष्ट्र पोलिस (शिक्षा व अपील) नियमावली १९५६ नुसार पोलिस निरीक्षक आणि त्याखालील कर्मचाऱ्यांना शिक्षेविरोधात अपील करण्याची तरतूद आहे. मात्र, पहिले अपील फेटाळल्यानंतरही काही कर्मचारी पुन्हा वरिष्ठ अधिकारी किंवा गृह विभागाकडे अपील करत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित होती.
या पार्श्वभूमीवर राज्य पोलिस दलाने नवीन परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार पहिले अपील फेटाळले गेल्यास त्याच प्रकरणात दुसरे अपील करता येणार नाही. अशा वेळी संबंधित कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात ‘मॅट’कडे दाद मागावी लागेल.
विशेष म्हणजे, मॅटचा निर्णय विरोधात गेल्यास उच्च न्यायालयात जाण्याचाही पर्याय कायम राहणार आहे. मंडळी, पोलिसांच्या अपील प्रक्रियेवर अशी मर्यादा आणणे योग्य आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा!





