Latest

शेळीला वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला आणि त्यानंतर…. श्रीरामपुरात बिबट्याचा थरार !

शेतात अचानक बिबट्या आला आणि थेट शेळीवर झडप घातली! समोर मृत्यू उभा असतानाही शेतकऱ्याने धाडस दाखवलं आणि हातातील काठी घेऊन बिबट्याला पिटाळून लावलं. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान परिसरात घडली. नेमकं काय घडलं ते सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, घुमनदेव रोड परिसरात मच्छिंद्र पटारे यांची शेळी शेतात चरत होती. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. मात्र, पटारे यांनी प्रसंगावधान राखत काठीच्या साहाय्याने बिबट्याला पिटाळलं. त्यामुळे शेळीचा जीव वाचला, पण ती जखमी झाली.

विशेष म्हणजे, या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचं दर्शन होत आहे. पाळीव कुत्रे आणि शेळ्यांवरही हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.

आता बिबट्या मानवी वस्त्यांजवळ येत असल्याने नागरिकांमध्ये भीती आहे. म्हणून वनविभागाने तातडीने पिंजरे लावावेत, अशी मागणी होत आहे. तर मग मंडळी तुमच्याकडेही बिबट्याची अशीच दहशत आहे का? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button