
भावाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या आकाशचा अखेर २६ दिवसांनी मृतदेह सापडलाय. नेमकं प्रकरण काय ? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा. मंडळी अकोले तालुक्यातील ही घटना काळीज पिळवटून टाकणारी आहे.
२२ ऑक्टोबर रोजी बाळू अनिल शिंदे हा तरुण पाण्यात बुडत होता. त्याला वाचवण्यासाठी सागर पथवे याने प्रवरा नदीत उडी घेतली. मात्र, सागरला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ आकाश पोपट पथवे यानेही क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी मारली.
या घटनेत सागरचा जीव वाचला. मात्र, बाळू शिंदे आणि आकाश पथवे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बाळूचा मृतदेह त्याच दिवशी सापडला, पण आकाशचा शोध सुरूच होता.
अखेर २६ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर प्रवरा नदीचे पाण्याचे आवर्तन सुरू झाले आणि सोमवारी कळस शिवारात आकाशचा मृतदेह आढळून आला.
भावासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आकाशच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर मग मंडळी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.





