
पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता जमा होऊनही तुमच्या खात्यात २ हजार रुपये आले नाहीत का? मग काळजी करू नका! तुमचा हप्ता नेमका कुठे अडकला आहे, हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता. नेमकी कशी आहे प्रोसेस? सगळं सांगतो. त्या आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, केंद्र सरकारने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २४ व्या हप्त्याचे २ हजार रुपये जमा केले आहेत.
मात्र, ई-केवायसी अपूर्ण असणे, आधार लिंक नसणे, बँक खात्यातील नावात चूक किंवा जमिनीची पडताळणी पूर्ण नसणे, यामुळे पैसे अडकू शकतात. यासाठी सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
Farmer Corner मधील ‘Know Your Status’ हा पर्याय निवडा आणि हप्त्याची सद्यस्थिती तपासा. Land Seeding किंवा e-KYC समोर ‘No’ दिसत असल्यास संबंधित त्रुटी दुरुस्त करा.
गरज पडल्यास जवळच्या CSC केंद्रावर संपर्क साधा. तर मग मंडळी, तुम्हाला दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला की नाही कमेंट करून नक्की सांगा.





