Latest

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात गीतांजली शेळके यांची एंट्री; ‘या’ मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा !

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची आगामी निवडणूक गीतांजली शेळके लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. पारनेर तालुक्यातील सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून त्या निवडणूक मैदानात उतरणार आहेत.

शेळके या गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा बँकेच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत. दिवंगत ॲड. उदय शेळके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची बिनविरोध निवड झाली होती.

या काळात सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. बँकेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी पारनेरमध्ये मेळावेही घेण्यात आले.

आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरावधारक मतदारांशी संपर्क वाढवण्यावर त्यांचा भर आहे. निघोज, कान्हूर पठार आणि टाकळी ढोकेश्वर परिसरात त्यांनी भेटीगाठी घेतल्या असून, या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिवंगत उदय शेळके यांच्या सहकार क्षेत्रातील वारशाचीही या निवडणुकीत चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button