Latest

मुली मुलांवर नाही, पैशांवर प्रेम करतात!” इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या एका विधानामुळे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मंडळी, ही बातमी तुम्ही पाहताय, पण त्याआधी अहिल्यानगर जिल्ह्यातील अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी AhilyanagarLive24 ला फॉलो करायला विसरू नका!

एका कीर्तनादरम्यान इंदुरीकर महाराजांनी मुला-मुलींच्या प्रेमसंबंधांवर भाष्य केले. ते म्हणाले की, मुलगी कधीच मुलावर प्रेम करत नाही, तर ती पैशांवर प्रेम करते. प्रेमाची व्याख्या सांगताना त्यांनी ‘लव्ह इज अ मनी आणि मनी इज अ लव्ह’ असेही म्हटले. यावेळी त्यांनी उपस्थित तरुणांना प्रेमातील अनुभवांवरून मिश्किल टोले लगावले.

याशिवाय मोबाईलच्या अतिवापराबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. मोबाईलमुळे लोक वेडी झाली असून सतत मोबाईल वापरणे टाळावे, असा सल्ला त्यांनी दिला.

दरम्यान, सरकारकडून मिळालेल्या आर्थिक मदतीचे त्यांनी कौतुक केले. तसेच जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या शाळा टिकवणे गरजेचे असल्याचे सांगत सर्वसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला.

त्यांच्या प्रेमाबाबतच्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. मंडळी, इंदुरीकर महाराजांचे मुलींबाबतचे हे विधान तुम्हाला कितपत योग्य वाटते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button