Latest

अहिल्यानगरमध्ये यावर्षी पहिल्यांदाच कांदा साडेपाच हजार पार ! कुठे मिळाला विक्रमी भाव?

शेतकऱ्यांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे; पण वाढलेली आवक पाहता पुढे दराचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे!

मंडळी, शुक्रवारी राहाता बाजार समितीत कांद्याची ५ हजार ६१३ गोण्यांची आवक झाली. आवक वाढूनही दर्जेदार कांद्याला चांगला दर मिळाला. नंबर एक कांद्याला ४ हजार ३०० ते तब्बल ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

नंबर दोन कांद्याला २ हजार ७०० ते ४ हजार २५०, तर नंबर तीन कांद्याला १ हजार ते २ हजार ६५० रुपये दर मिळाला. गोल्टी कांद्याला १ हजार ५०० ते ३ हजार ८०० रुपये, तर जोड कांद्याला ७०० ते २ हजार रुपये भाव मिळाला.

दरम्यान, डाळिंबाचीही मोठी आवक झाली. तब्बल ११ हजार ४०९ कॅरेट बाजारात दाखल झाले. नंबर एक डाळिंबाला १९१ ते ३०५ रुपये, तर नंबर चारला १० ते ५० रुपये भाव मिळाला. आता प्रश्न एकच—कांद्याची आवक आणखी वाढली, तर ५५०० रुपयांचा कमाल भाव टिकणार का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button